Welcome to Maharashtra Mandal, Bhubaneswar!🙏
|| मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा ||
Welcome to Maharashtra Mandal, Bhubaneswar!🙏
|| मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा ||
हे बंध स्नेहाचे, हे बंध रक्षणाचे, रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!||
Executive Committee Members of Mandal for 2025-26 selected in AGM on 14 Apr 2025
Gudi Padwa Celebration at Governor's House, Bhubaneswar
ओडिशातील महाराष्ट्रीयन होलिका दहन करताना
ओडिशातील महाराष्ट्रीयन तुळशीचे लग्न साजरा करताना
ओडिशातील महाराष्ट्रीयन गणेशोत्सव साजरा करताना
भुवनेश्वर ही ओडिसा राज्याची राजधानी असुन हे शहर मंदिराचे शहर म्हणून प्रसिद्ध आहे. एक धार्मिक क्षेत्र तसेच प्रसिध्द पर्यटन स्थळ देखील आहे. येथील महाराष्ट्र मंडळाची स्थापना 1983 साली झाली. महाराष्ट्र मंडळ, भुवनेश्वर मधे अगदी मध्यवर्ती ठिकाणी आहे. मंडळात वर्षभर अनेक सांस्कृतिक व करमणुकीच्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. जवळ जवळ दीड एकशेच्या आसपास मराठी मंडळी इथे आहेत.
मंडळात एक मोठा हॉल, 1एसी खोली, ईत्यादी जागा उपलब्ध आहे.तसेच बाथरुम व किचनची देखील व्यवस्था आहे. आगदी माफक दरामध्ये पर्यटक याचा उपभोग घेऊ शकतात. इथे गणपती नंतर, साधारण फेब्रवारीपर्यंतचा कालावधी पर्यटना साठी योग्य आहे. येथील दसरा बघण्या सारखा असतो.
भुवनेश्वर पासून जगन्नाथ पुरी व कोणार्कचे सूर्यमंदिर तसेच जगप्रसिद्ध खाऱ्या पाण्याचे सर्वात मोठे सरोवर ' चिल्का लेक ' खूप जवळ आहे. ओरिसाला बंगालच्या उपसागराच्या किनारा लाभला आहे ह्यामुळेच ओरीसाला अप्रतिम असे निसर्ग सौंदर्य लाभले आहे. सुदर्शन पटनायक हा कलाकार इथल्याच मातीतला. समुद्राच्या वाळूतून अप्रतिम कलाकृती करण्यात हा कलाकार कुशल आहे. त्याची ही कलाकृती बघून डोळ्यांचे अगदी पारणे फिटते.
भुवनेश्वर पासून साधारण २०की.मी. अंतरावर पीपली गावं आहे.येथील patch work तसेच इतर कला कुसरीच्या वस्तू खूप सुंदर व प्रसिद्ध आहेत.असतात. येथील सरकार ही लघुउद्योगाला खूप प्रोत्साहन देते.
भुवनेश्वर मधिल नंदनकानान हे प्राणी संग्रहालय तसेच उदयगिरी व खंडगिरीची लेणी, तसेच काही प्राचीन मंदिरे, राजाराणी मंदिर, मुक्तेश्वर मंदिर, लींगराज मंदिर इ. ९व्या-१०व्या शतकातील असुन उत्तम कलाकृती चे नमूने आहेत. इथे दर वर्षी डिसेंबर महिन्यात कोणार्क फेस्टिवल असते तेव्हा खूप कलाकार त्यांच्या नृत्य संगीताने आपले मनोरंजन करतात.
तरी इच्छित मराठी परिवारांनी संपर्क साधावा.